S M L

दिल्ली उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणी ड्रायव्हर शिवकुमार यादव दोषी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 20, 2015 02:14 PM IST

दिल्ली उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणी ड्रायव्हर शिवकुमार यादव दोषी

20 ऑक्टोबर : दिल्ली उबेर टॅक्सी बलात्कार प्रकरणात आरोपी ड्रायव्हर शिवकुमार यादवला दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. येत्या 23 ऑक्टोबरला न्यायालय शिवकुमार यादवच्या शिक्षेची सुनावणी करेल. याप्रकरणी शिवकुमारला जन्मठेप होण्याची शक्यता आहे.

5 डिसेंबर 2014 रोजी दिल्लीत 27 वर्षाच्या पीडित महिलेने हॉटेलमधून घरी जाण्यासाठी मोबाईल ऍपवरून उबेरकडून टॅक्सी मागविली होती. शिवकुमार यादव या टॅक्सीचा चालक होता. टॅक्सीने घरी जात असताना त्याने पीडित महिलेला एका निर्जन स्थळी नेलं आणि त्यानंतर टॅक्सीतच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर यादवने पीडित महिलेला युवतीला तिच्या घरी सोडले आणि झाल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.

7 डिसेंबर 2014 ला शिवकुमारला अटक झाली होती. चौकशी दरम्यान यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढळून आला आहे. त्याच्यावर आधीही एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2015 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close