S M L

सरकारी नोकरीतील छोट्या पदासाठी आता मुलाखत नाही- पंतप्रधान

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2015 08:01 PM IST

modi man ki baat

25 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी 1 जानेवारी 2016 पासून मुलाखती घेण्यात येणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा आज (रविवारी) 'मन की बात'च्या मध्यमातून केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून बी, सी आणि डी श्रेणीतील केंद्र सरकारच्या नोकर्‍यांसाठी मुलाखती अट रद्द करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र कोणाच्याही शिफारसीवरून या नोकर्‍या देण्यात येणार नसल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर महाराष्ट्र सरकारने घेतले आहे. त्या घराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते लंडनला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमातून अवयव दानाचे महत्वही सांगितलं. 'अवयव दान, हे महादान' असून, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी #NOTTO ची स्थापना करण्यात आली असून 1800114770 या हेल्पलाइनवर अवयवदानासाठी नोंदणी करता येणार आहे. तसंच अवयवदाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 24 तास मदत उपलब्ध असेल पंतप्रधानांनी सांगितलं.

तसंच आपल्या देशात सोनं ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. सोनं हे आर्थिक सुरक्षेचं माध्यम बनलं आहे. त्यामुळेच सोनं हे देशाची संपत्ती बनू शकतं. म्हणूनच बँकेत ठेवण्यात येणार्‍या सोन्यावर व्याज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसंच येत्या दिवाळीत 5 आणि 10 ग्रॅमच्या अशोक चक्राच्या सोन्याचा शिक्काही उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला आजच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2015 11:43 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close