S M L

बिहारला तांत्रिकाची नाही लोकशाहीची गरज - पंतप्रधान

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2015 06:33 PM IST

बिहारला तांत्रिकाची नाही लोकशाहीची गरज - पंतप्रधान

25 ऑक्टोबर :  तांत्रिकाची भेट घेऊन, जादूटोणा करून कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला नरेंद्र मोदी यांनी आज नितीश कुमारांना हाणला. बिहार चालवण्यासाठी तांत्रिकाची गरज नाही.त्यासाठी लोकशाही सक्षम आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढारलेला बिहार हवा असेल तर तुम्हाला मागासलेल्या बिहारला हरवावच लागेल, असं आवाहनही मोदींनी प्रचारसभेत केलं आहे.

बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला तिसर्‍या टप्प्यातलं मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या सभा घेतल्या जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आजच्या सभेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'महास्वार्थबंधन' मध्ये तीन नव्हे चार खेळाडू आहेत. त्यात पहिले लालू, दुसरे नीतीश, तिसर्‍या सोनिया आणि चौथे हे मांत्रिक आहेत. लोकशाही जादू- टोण्यावर चालत नाही.

नितीश-लालू यांनी कितीही चिखलफेक केली तरी कमळ चिखलातच फुलतं हे ध्यानात ठेवा, असंही मोदींनी सुनावलं.

वीज, पाणी आणि चांगले रस्ते हा आमचा बिहारसाठी त्रिसूत्री कार्यक्रम असून शिक्षण, रोजगार आणि औषधे हे आमचं व्हिजन असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. आजची ही रॅली म्हणजे केवळ एक सभा नसून परिवर्तनाचा संकल्प करण्यासाठीचा महामेळावा आहे. ही निवडणूक फक्त बिहारला नव्हे तर संपूर्ण देशालाही दोनवेळा दिवाळी साजरी करण्याची संधी देणार असल्याचं सांगत त्यांनी बिहारमध्ये भाजपलाच विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2015 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close