S M L

कॉल ड्रॉपची नुकसान भरपाई देण्यास कंपन्यांचा नकार

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2015 09:46 AM IST

 कॉल ड्रॉपची नुकसान भरपाई देण्यास कंपन्यांचा नकार

28 ऑक्टोबर : मोबाईलवर जर कॉल ड्रॉप झाला त्याची एक रुपया नुकसान भरपाई टेलिकॉम कंपन्यांनी द्यावी, असा निर्णय ट्रायने दिला होता. मात्र, याबद्दलची नुकसान भरपाई देण्याची टेलिकॉम कंपन्यांची तयारी नाहीये.

कॉल ड्रॉपची नुकसान भरपाई द्यायची झाली तर टेलिकॉम कंपन्यांना 54 हजार कोटींचा भुर्दंड पडेल, असं या कंपन्यांनी म्हटलंय. छोट्या टोलिकॉम कंपन्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान होईल, असंही या कंपन्यांचं म्हणणं आहे. टेलिकॉम कंपन्या याबद्दल ट्रायशी वाटाघाटी करतायत. या कंपन्यांचे प्रतिनिधी ट्रायच्या प्रमुखांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत. आयबीएन नेटवर्कने कॉल ड्रॉपविरोधात विशेष मोहिम छेडली होती. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली होती. त्यांनी यावर तोडगा काढण्याचे तसे आदेशही दिले होते. ट्रायने याबाबत पावलं उचलतं कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close