S M L

शाहरुखच्या मुद्दयावर राज गप्प...

3 फेब्रुवारीमराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या शिवसेनेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तोडीस तोड उत्तर दिले. पण सेनेने उचललेल्या शाहरुख खानच्या मुद्द्याला मात्र राज ठाकरेंनी बगल दिली. डोंबिवलीत झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून चौफेर टोलेबाजी केली. भाषणात त्यांनी राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुकेश अंबानी यांच्यावर जोरदार टीका केली. आजच्या भाषणात त्यांचा मुख्य रोख होता तो राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर. राहुल गांधी ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणार्‍या हल्ल्याबाबत का बोलत नाहीत? वर्षानुवर्षे सत्ता असतानाही राहुल गांधींच्या काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास का केला नाही? तेथील लोकांना रोजगार शोधण्यासाठी स्थलांतरीत का व्हावे लागते? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. इतर राज्यांमध्ये भाषेविषयक प्रखर अभिमान बाळगला जातो हे सांगताना त्यांनी तामीळनाडूतील अण्णा दुराई यांच्या पुतळ्याखाली 'नो हिंदी'च्या सूचनांचा फोटो दाखवला. गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ती पुतळ्याखालची पाटी हलवून दाखवावी असे आव्हानही राज यांनी दिले. तर आरएसएसने कर्नाटकातले कायदे बदलवून दाखवावेत असे ते म्हणाले. आपण देश अभंग राहावा या मताचेच आहोत, पण आमची मराठी अस्मिता देशाने जपावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाषेची भिंत उभी केल्याशिवाय परप्रांतीयांची आक्रमणे थांबणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने मराठी बोलावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. टॅक्सीच्या परवान्यांसह मराठीविषयक सध्या सुरू असलेल्या सर्व मुद्द्यांना राज यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. उद्धव ठाकरेंवरही त्यांनी नाव न घेता जोरदार टीका केली. पण शिवसेनेने उचललेल्या शाहरुखच्या माफीच्या मुद्द्याबद्दल त्यांनी अवाक्षरही उच्चारले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2010 03:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2010 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close