S M L

साहित्यिकांपाठोपाठ दिग्दर्शकांनीही परत केले पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2015 11:40 AM IST

साहित्यिकांपाठोपाठ दिग्दर्शकांनीही परत केले पुरस्कार

kalburgi_case_29 ऑक्टोबर : डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून साहित्यिकांपाठोपाठ आता चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनीही आपले पुरस्कार परत केले आहेत.

प्रतिक वत्स, विक्रांत पवार, दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन, परेश कामदार, निष्ठा जैन, किर्ती नाखवा, हर्षवर्धन कुलकर्णी हरी नायर, राकेश शर्मा, इंद्रनील लाहिरी, लिपीका सिंग या 12 जणांनी सरकारला त्यांना मिळालेलं नॅशनल अवॉर्ड परत केले आहे.

यासंदर्भातलं पत्र त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय. आम्हाला कुणी राजकारणामध्ये प्रेरीत म्हटलं तर म्हणू देत. ते काहीतरी म्हणतील. पण त्यामुळे काही बदलणार नाहीये. यापुढे ही ते कुणाला ना कुणाला पारितोषिक देतीलचं. कदाचित यापुढे ते अशा लोकांना पारितोषिक देतील जे परत करतील असं त्यांना वाटणार नाही अशी प्रतिक्रिया आनंद पटवर्धन यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2015 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close