S M L

'तो' रुद्र पाटील नाही, नातेवाईकांचा दावा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 29, 2015 10:44 PM IST

êÖêËêÖêËêÖê

29 ऑक्टोबर : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी हत्या प्रकरणी बेळगावजवळच्या खानापूरमधील जंगलात काही दिवसांपूर्वीच एक मृतदेह आढळला होता. तो मृतदेह कलबुर्गी यांच्या संशयित मारेकर्‍याचा असल्याचा संशय होता. मात्र सापडलेला मृतदेह रुद्रगौडा पाटीलचा नसल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. याबाबत पोलिसांनी नीट चौकशी केली नसल्याचा आरोपही रुद्रगौडा पाटील याच्या नातेवाईकांनी केली आहे. गेल्या 15 दिवसांत पोलिसांनी आमच्याकडे कोणतीही चौकशी केली नसल्याचं रुद्रचे आई वडीलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कलबुर्गी हत्या प्रकरणातला प्रमुख संशयित मारेकरी रुद्र पाटील याच्या चेहर्‍याशी मिळता जुळता चेहरा असणार्‍या मृतदेहाची स्थानिक पोलिसांनी विल्हेवाट लावली आहे. विशेष म्हणजे धारवाड पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता तब्बल 9 दिवसांनी हा मृतदेह अणोळखी म्हणून दफनही करून टाकला. त्यानंतर मृतदेहाचा चेहरा रुद्र पाटीलच्या चेहर्‍याशी मिळताजुळता असल्याचं सामजताच पोलीस यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे.काल सीआयडीचं एक पथक खानापुरात दाखल झालं आहे. खून झालेल्या व्यक्तीला बेळगावमधल्या रूक्मिणीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलं होतं. पोलिसांनी काल (बुधवारी) रात्री उशीरा दफन केलेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह उकरून काढला आहे. आता त्या मृतदेहाची डी एन ए चाचणी करण्यात येणार असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2015 07:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close