S M L

पुन्हा धमकी..पुन्हा नकार..!

4 फेब्रुवारीशिवसेना आणि शाहरुख खान यांच्यातला वाद चिघळत चालला आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा शाहरुखला धमकी दिली आहे. तर शाहरुखने माफी मागायला पुन्हा ठाम नकार दिला आहे. शाहरुखची ही भूमिका कायम असेल तर त्याला देशात राहण्याचाच अधिकार नाही, असे राऊत यांचे म्हणणे आहे. शाहरुखने पहिल्यांदा मुंबईत यावे, मग बघू घेऊ.. अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे. शाहरुखच्या मुद्द्यावर सेना आक्रमक झाली असली तरी किंग खानही मागे हटायला तयार नाही. कुणाच्याही दबावाखाली मी माफी मागणार नाही, असे तो पुन्हा एकदा म्हणाला आहे. लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता. मी जे म्हणालो ते सत्य आहे. मला माझ्या देशाबद्दल अभिमान आहे. दुस-या देशातले लोक माझ्या देशात यावेत आणि माझ्या देशातल्या भरभराटीत भाग घ्यावा, असे मला वाटते. माझी अपेक्षा चुकीची असेल तर मला माझ्या मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळत आहे, त्याचाही फेरविचार करावा लागेल. सध्याच्या वातावरणामुळे 'माय नेम इज खान'या सिनेमाचे नुकसान होतेय. त्याबद्दल मी माझ्या सहका-यांची माफी मागतो, असेही शाहरुख या पत्रकार परिषदेत म्हणाला. शाहरुख प्रकरणावरून शिवसेनेच्या सामना या दैनिकातून गेले काही दिवस चिथावणीखोर लिखाण केले जात आहे. यावर आता कारवाई करण्याचे संकेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. हे लिखाण विधी विभागाकडे अभ्यासासाठी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर पुन्हा यावर अशा कारवाईला आम्ही घाबरत नाही, असे संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. दुसरीकडे मित्रपक्ष भाजपलाही राऊत यांनी सुनावले आहे. शिवसेनेने कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करावे, असे भाजपने म्हटले होते. त्यावर भाजपने आम्हाला कायदा शिकवू नये, असा टोला राऊत यांनी हाणला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2010 08:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2010 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close