S M L

'झेंडे' आणि 'दांडे' झाले गुल!

5 फेब्रुवारीराहुल गांधींना मुंबईत येऊ द्या मग त्यांना दाखवू काय ते..शिवसेनाप्रमुखांनी दिलेला काळे झेंडे दाखवण्याचा आदेश आणि रस्त्यावर उतरण्याची सेनेने केलेली हवा..प्रचंड संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरतील..काळे झेंडे दाखवत निदर्शने करतील..काँग्रेसवाल्यांची हवा टाईट करतील...आज सकाळपर्यंत हीच हवा होती. पण राहुल गांधींच्या झंझावाती दौ-यात विरोधाची हवा कधीच विरून गेली. आणि निषेधाचे काळे झेंडे आणि त्यांचे दांडे सांभाळणारे सेना नेते ऐन वेळी 'गुल' झाले...बाळासाहेबांनी आव्हान दिले की शिवसेनेचा नेता असो की कार्यकर्ता रस्त्यावर उतरलाच म्हणून समजा असं आतापर्यंतचं चित्रं होतं. पण राहुल गांधींच्या विरोधातल्या शिवसेनेच्या आंदोलनात जरी कार्यकर्ते काही ठिकाणी उतरले असले तरी नेते मात्र गायब होते. त्यामुळं बिना नेत्यांच्या आंदोलनाचे शिवसैनिकांनी केलेले एकदोन प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. आजच्या या आंदोलनामुळं राहुल यांच्या दौर्‍यात कसलाही अडथळा नको म्हणून पोलिसांनी कालच काही शिवसैनिकांची धरपकड केली. पण सेनेच्या बर्‍याचशा नेत्यांवर मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळं काही नेते शिवसैनिकांना हाताशी धरून या चोख बंदोबस्तातही कामगिरी पार पाडतील, अशी अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही त्यामुळं खुद्द उद्धव ठाकरेंनाही आपली बाजू सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागली. रविंद्र वायकर, राजुल पटेल असे हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही नेते वगळता शिवसेनेच्या इतर नेत्यांनी घरी बसणंच पसंत केलं. त्यामुळं आंदोलनाचा बोर्‍या तर वाजलाच, पण सर्वसामान्य शिवसैनिकही नाराज झाले... एरवी एकमेकांचे पाय ओढणारे काँग्रेसचे नेते एक झाले आणि त्यांनी शिवसेनेला चितपट केले. आंदोलन रोखण्यासाठी कडेकोट तयारी केलेल्या पोलिसांनी ठिकठिकाणी शिवसैनिकांची उचलबांगडी केली. आंदोलनाचा प्रयत्न करणा-या सेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांना शिवसैनिकांसह पार्ल्यातून अटक करण्यात आली. शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांना विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर अटक करण्यात आली. तर अनिल परब, जितेंद्र जनावळे, राजू पेडणेकर, सुभाष सावंत या शिवसैनिकांनाही ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतरही सेनेचा एकही मोठा नेता आज रस्त्यावर उतरला नाही. दुस-या फळीचे मोजकेच नेते शिवसैनकांसोबत रस्त्यावर उतरले. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून निषेध करा, असं आवाहन बाळासाहेबांनी केले होते. तरीही हे नेते आंदोलनातून गायब होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2010 10:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close