S M L

असहिष्णुता रोखण्यासाठी कायदा हवा, सरकारला उपरती

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2015 07:01 PM IST

असहिष्णुता रोखण्यासाठी कायदा हवा, सरकारला उपरती

04 नोव्हेंबर : देशभरात असहिष्णुतेचं वातावरणावरुन वादंग निर्माण झालाय. अखेर सरकार जाग आली असून देशात असहिष्णुतेला खतपाणी घालणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असं मत केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात मांडलंय.

देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल नाराजी पसरत आहे. सत्ताधारी पक्षातलेच काही नेते प्रक्षोभक विधानं करत आहे. आणि साहित्यिक पुरस्कार परत करतायत. अशा स्थितीत द्वेष पसरवणारी भाषणं करणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी, असं मत केंद्रानं मांडलंय.

तसंच दोन धर्मांत तेढ निर्माण करणारं विधान केल्याचा आरोप असणारे भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात खटला चालवायला पाठिंबाही दिला.

स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. आणि आयपीसीमधली काही कलमं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचं म्हटलं होतं. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयानं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. आणि सुब्रमण्यम स्वामी यांचा मुद्दा खोडून काढला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तेढ निर्माण करण्याचा परवाना नाही, असं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2015 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close