S M L

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 60 टक्के मतदान

Samruddha Bhambure | Updated On: Nov 5, 2015 10:36 PM IST

bihar-election38_041814015329

05 नोव्हेंबर : बिहारमध्ये आज (गुरुवारी) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 60 टक्के मतदान झालं. सर्व 5 टप्प्यांमध्ये मिळून 56.80 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीये.

बिहारमधल्या सर्व 243 विधानसभा मतदारसंघांसाठी हे मतदान झालं. सीमांचल, कोसी आणिमिथीलांचलच्या नऊ जिल्ह्यात विधानसभेच्या 57 जागांसाठी मतदान झालं. विजेंद्र प्रसाद यादव, लेसी सिंह, बीमा भारती, माजी मंत्री नितीश मिश्रा यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. एकूण 827 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी मतमोजणी होणार आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीनं वेधून घेतलं होतं. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम संपूर्ण देशाच्या राजकारणावर होईल असं मानलं जातंय. त्यामुळेच राजकीय पक्षांबरोबरच, विश्लेषक आणि सामान्य लोकही रविवारच्या निकालाकडे लक्ष ठेवून असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close