S M L

सोनं ठेवा पैसे कमवा, तीन सुवर्ण योजनेचा शुभारंभ

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2015 08:23 PM IST

सोनं ठेवा पैसे कमवा, तीन सुवर्ण योजनेचा शुभारंभ

05 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुवर्ण योजनेचं उद्घाटन केलं. सुवर्णरोखे आणि सुवर्ण चलनीकरणसह तीन योजनांची सुरुवात करण्यात आली. आता पडून असलेल्या सोन्यावर आणि दागिन्यांवर तुम्हाला व्याज मिळवता येणार आहे. कोणत्याही भारतीय व्यक्तीला या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. कमीतकमी 30 ग्रॅम सोनं आणि आणि दागिने ठेव म्हणून ठेवता येईल. ही योजना 100 टक्के सुरक्षित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

सोन्याची शुद्धता तपासल्यानंतर सोन कमी-अधिक काळाकरता व्याजावर स्विकारलं जाईल. त्याचं प्रमाणपत्र मिळेल आणि दर महिन्याला व्याजही मिळणार आहे. तर दुसरी योजना आहे सुवर्णरोखे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दोन ग्रॅम, 5 ग्रॅम किंवा त्यापटीत 500 ग्रॅमपर्यंत दरवर्षी ग्राहकाला घेता येतील. या रोख्यांवर 2.57 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज करपात्र असेल. पण रोखे डी मॅट फॉर्ममध्ये उपलब्ध असेल. या रोख्यांची मुदत 8 वर्षांची असेल आणि 5 वर्षांनी बाहेर पडता येईल.

काय आहे सुवर्ण योजना ?

सुवर्ण मॉनिटायझेशन योजना

- सर्व नागरिक गुंतवणूक करू शकतात

- किमान ठेव 30 ग्रॅम निखळ सोनं

- पडून असलेल्या सोन्यावर मिळणार व्याज

- कमी सोनं आयात करायला लागल्यानं देशाला लाभ

- मुद्दल आणि व्याजाची गणना सोन्यामध्ये

सॉवेरीन गोल्ड बाँड्स स्किम

- भारत सरकारकडून 1 ग्रॅम सोनं आणि त्याच्या पटीतल्या मूल्यांमध्ये बाँड्स

- किमान गुंतवणूक - 2 ग्रॅम, कमाल गुंतवणूक - 500 ग्रॅम

- बाँड्सचा कालावधी 8 वर्षं

- डिमॅट आणि पेपर स्वरुपात उपलब्ध

- शेअर बाजारात ट्रेड करता येणारा

इंडियन गोल्ड कॉइन

- 24 कॅरेट शुद्धता, 999 फाइननेस

- बीआयएसद्वारे हॉलमार्क केलेले

- 5 आणि 10 ग्रॅम कॉइन आणि 20 ग्रॅम लगडीमध्ये उपलब्ध

- देशातील सर्व एमएमटीसी सेंटरमध्ये उपलब्ध

- सुलभ रोखीकरण क्षमता

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close