S M L

पवारांचे खापर मीडियावर...

7 फेब्रुवारीसध्या महागाईवरून माझ्याबद्दल कुणीही उठून बोलते आहे. पण माझी चिंता करु नका. केवळ टीआरपीसाठीच मीडियाकडून अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत, असे कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. भाववाढ झाली हे सत्य आहे. पण आम्ही गरिबांना स्वस्त धान्य पुरवत आहोत. याच सरकारच्या नव्हे तर एनडीए सरकारच्या वेळीही धान्य आयात होत होती. टंचाईच्या परिस्थितीत ते करावेच लागते. त्यात नवीन काय आहे, पण ही बाब अकारण 'बातम्यांचे विषय' होत आहे. आणि हे टीआरपीसाठी केले जात आहे, असे खापर पवारांनी मीडियावर फोडले आहे. औरंगाबादेत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात पवार मार्गदर्शन करत होते.शिवाय दिल्लीतल्या बैठकीत टीका करणार्‍या अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांकडेही दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला आहे. महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना टार्गेट करण्यात काँग्रेस पक्षच आघाडीवर असल्याची टीका पक्षाच्या शिबिरात पहिल्याच दिवशी करण्यात आली. त्याला पवार सडेतोड उत्तर देतील असे बोलले जात होते. पण पवारांनी सबुरीची भूमिका घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे. गेले अनेक दिवस काँग्रेस आणि इतर पक्षांनी महागाईच्या मुद्द्यावरून पवारांवर आरोप केलेत. दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतही पवारांवर टीका झाली होती. पवारांनी त्यांच्याकडे असलेले ग्राहक संरक्षण खाते सोडावे, असा दबाव त्यांच्यावर आणला जात आहे. या पार्शवभूमीवर स्वत: पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दुसरीकडे या शिबिरात राष्ट्रवादीतली अंतर्गत गटबाजी हासुद्धा पवारांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐनवेळी चर्चेला यावा अशी मागणीही होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2010 10:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close