S M L

राजनची सीबीआय कोठडीत रवानगी

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2015 10:59 PM IST

राजनची सीबीआय कोठडीत रवानगी

06 नोव्हेंबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजेच्या मुसक्या आवळ्यानंतर आज त्याला भारतात आणण्यात आलं. संध्याकाळी त्यांची वैद्यकीय तपासणीनंतर त्याला CBI मुख्यालयातल्या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने राजनची सीबीआय कोठडीत रवानगी केलीये. कालच त्याच्यासंबंधी सर्व प्रकरणं तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं.

सीबीआयच्या अधिकार्‍यांनी आज त्यांली इंडोनेशियातून घेऊन आले. मात्र, या अटकेमुळे मुंबई पोलिसांमध्ये नाराजी पसरल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाही, तर छोटा राजनला झालेली अटक म्हणजे पूर्वनियोजित प्रकार असल्याची भावनाही मुंबई पोलिसांमध्ये पसरली आहे. यामध्ये केंद्रीय गुप्तचर संस्थांचीही भूमिका असल्याचं काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी IBN नेटवर्कला सांगितलंय.

दरम्यान, छोटा राजनला आज भल्या पहाटे अखेर भारतात आणण्यात आलं. पण एवढ्या मोठ्या डॉनला भारतात आणल्यावर ड्रामा नसता झाला, तरच नवलच. त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि विमानतळापासून सीबीआय मुख्यालयातच्या प्रवासात मीडियाया ससेमिरा चुकावा, यासाठी सीबीआयने चक्क डमी ताफ्याची क्लुप्ती उपयोगात आणली. सीबीआयने रात्रीतून एक डमी छोटा राजन तयार केला. आणि साडेपाचच्या सुमारास छोटा राजन डमी ताफा विमानतळाबाहेर काढला. माध्यमं देखील सीबीआयच्या जाळ्यात अलगद अडकली आणि या डमी ताफ्याचा पाठलाग करू लागली. पण या ताफ्यात प्रत्यक्षात छोटा राजन नव्हताच...कारण सीबीआयने माध्यमांचे कॅमेरे विमानतळावरून हटल्यानंतर यथावकाश खर्‍या छोट्या राजनला दुसर्‍या मार्गाने सीबीआय मुख्यालयात पोचवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2015 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close