S M L

महाआघाडी झाल्यामुळे आमचा पराभव झाला -जेटली

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2015 09:25 PM IST

महाआघाडी झाल्यामुळे आमचा पराभव झाला -जेटली

09 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निकालाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक झाली. आम्ही जनतेचा निर्णय मान्य केल्याचं, या बैठकीनंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं. महाआघाडीची स्थापना तसंच बिहारमधल्या परिस्थितीचं आकलन करण्यात आलेलं अपयश ही पराभवाची कारणं असल्याचं जेटलींनी कबुल केलं. आरजेडी आणि जेडीयू या पक्षांचे समर्थक एकमेकांच्या उमेदवारांना मतं देतील असं आम्हाला वाटलं नव्हतं अशी कबुलीही जेटली यांनी दिली. त्याचवेळेला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेबद्दल महाआघाडीनं मोठा प्रचार केला. मात्र तो चुकीचा होता असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, या बैठकीआधी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. जवळपास दीड तास ही बैठक

चालली. बिहारमधल्या भाजपच्या पराभवावर या बैठकीत चर्चा झाली. अशातच भाजपच्या काही स्थानिक खासदारांनी बिहारमधला पराभव हा मोहन भागवतांच्या आरक्षणविरोधी विधानामुळे झाल्याचं मत व्यक्त केल्याने संघ परिवारात चांगळीच खळबळ उडाली आहे. याच मुद्यावरून संघ आणि भाजपात बैठकांचं सत्रं सुरू झाल्याचं कळतं. दरम्यान, या चिंतन बैठकीनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2015 09:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close