S M L

टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍या विहिंप कार्यकर्त्याचा मृत्यू

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2015 11:24 PM IST

टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍या विहिंप कार्यकर्त्याचा मृत्यू

10 नोव्हेंबर : कर्नाटकातील कोडगू इथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

कर्नाटक सरकारच्यावतीनेसाजरा करण्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंतीला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे. टिपू सुलतान हा धर्मांध शासक होता, असा आरोप करीत विश्व हिंदू परिषदेने जयंती कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज कोडगू इथे विहिंपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शनं करत होते. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलन हिंसक बनले. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यात विहिंपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केलं.

विहिंप कार्यकर्त्याच्या मृत्यूची बाबतमी वार्‍यासारखी पसरली आणि परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, टिपू सुलतान जयंती कार्यक्रम घेण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्याने विहिंपचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2015 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close