S M L

ओबामांकडून मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2015 01:57 PM IST

obama and modi Walking & Talking (19)

11 नोव्हेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल (मंगळवारी) रात्री फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी आज (बुधवारी) याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली. या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं आहे, की अमेरिकेच्या अध्यक्षांचा मला फोन आला होता. आम्ही दोघांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नव्याने सुरू झालेल्या हॉटलाईनवर आमच्यात झालेली हे पहिलंच संभाषण आहे. आमच्यात अन्य काही मुद्द्यांवरही चर्चा झाली. व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी कशी साजरी होते, हे ऐकून बरं वाटलं.

पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रिटन आणि तुर्कस्तान दौर्‍यावर जात आहेत. तुर्कस्तानमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरला होणार्‍या जी-20 परिषदेमध्ये मोदी आणि ओबामा यांची भेट होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2015 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close