S M L

'उल्फा' संघटनेचा नेता अनूप चेतिया सीबीआयच्या ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2015 04:08 PM IST

'उल्फा' संघटनेचा नेता अनूप चेतिया सीबीआयच्या ताब्यात

11 नोव्हेंबर : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या अतिरेकी संघटनेचा नेता अनूप चेतिया याला बांगलादेश सरकारने भारताच्या ताब्यात दिलं आहे. छोटा राजनपाठोपाठ चेतियालाही भारतात परत आणण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे.

बांगलादेशने अनूप चेतिया याला 1997 साली अवैध पासपोर्ट वापरून घुसखोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याजवळून शस्त्रास्त्रे आणि परकीय चलनही ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या 18 वर्षांपासून तो बांगलादेशच्या कारागृहात होता. खून, खंडणी आणि अपहरण अशा अनेक गुन्ह्यांत भारताला हवा असलेला अनूप चेतिया याला अखेर काल (मंगळवारी) रात्री दोन वाजता बांगलादेशने भारताच्या स्वाधीन केलं. सीबीआयने चेतिया याला ताब्यात घेतलं आहे.

उल्फा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेचा चेतिया हा महासचिव आहे. त्याच्यावर आसाममध्ये पोलिसांची हत्या, अपहरण, बनावट नोटांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. भारतातही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

यादरम्यान चेतियाने तीन वेळा बांगलादेशकडे राजनैतिक शरणागती मागितली होती. 2003 मध्ये बांगलादेशमधील हायकोर्टाने त्याला तुरुंगात ठेवण्याचं आदेश दिलं होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2015 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close