S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या ब्रिटन दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2015 02:13 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या ब्रिटन दौर्‍यावर

12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) ब्रिटनच्या दौर्‍यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा 3 दिवसांचा असणार आहे. ब्रिटनबरोबर आर्थिक सहकार्य वाढवण्यावर या दौर्‍यात भर दिला जाणार आहे. विशेषतः द्विपक्षीय व्यापार वाढवणे, संरक्षण क्षेत्रामध्ये भागीदारी वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. या दौर्‍यादरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मेजवानीचं आयोजन केलं आहे. आपल्या ब्रिटन दौर्‍यात पंतप्रधान मोदी ब्रिटिश संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. त्यांचं हे भाषण आज रात्री 9 वाजता होईल. शुक्रवारी ते लंडनच्या प्रसिद्ध वेब्ली स्टेडियमवर भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांची मोठी सभा घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2015 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close