S M L

बीटी वांग्याला परवानगी नाही

5 फेब्रुवारीअखेर केंद्र सरकारने बीटी वांग्याला परवानगी नाकारली आहे. बीटी वांग्याला सध्या तरी परवानगी नाही, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली आहे. बर्‍याच राज्यांनी याबद्दल आपल्याला पत्र लिहिले आहे. आणि यावर सारासार विचार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी बीटी वांग्याला केंद्रसरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने मान्यता दिली होती. पण भारतातील लागवडीला मान्यता देणार्‍या समितीचे सदस्यच या निर्णयावर सहमत नसल्याचे स्पष्ट झाले होते. बीटी वांग्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, याची दखल यात घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत वाणाच्या आवश्यक त्या चाचण्याही घेतल्या नसल्याचे या तज्ज्ञ समितीतील काही सदस्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसात खुद्द जयराम रमेश यांनाच यावरून देशभरात आंदोलनांना सामोरे जावे लागले होते. बीटी वांग्याबद्दल...- बीटी तंत्रज्ञान म्हणजे वांग्याच्या बियाण्यामध्ये घडवून आणलेला जनुकीय बदल- बीटी म्हणजे बॅसिलस थोरँजिनेसिस- या जिवाणूचे जीन्स वांग्याच्या बियाण्यामध्ये सोडले जातात- बीटी बियाण्यामुळे वांग्याच्या उत्पादनामध्ये सुधारणा होईल, असा या महिको या बियाणे कंपनीचा दावा- मोन्सँटो या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने महिकोने हे बियाणे बनवले- बीटी वांग्याबद्दल वैज्ञानिक, पर्यावणवादी कार्यकर्ते, शेतकरी संघटना, सरकारचे प्रतिनिधी यांची वेगवेगळी मते- जनुकीय तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या पिकांचे दुष्परिणाम होतात, असा काही पर्यावरणवाद्यांचा दावा- जनुकीय बदल करून केलेल्या पदार्थांची चाचणी उंदरांवर करण्यात आली होती- या पदार्थांचा उंदरांची फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांवर परिणाम झाल्याचे एका संशोधनात आढळून आले - बीटी वांग्याच्या बियाण्यासाठी जेनेटिक इंजीनिअरिंग ऍप्रूव्हल कमिटी मोन्सँटो या अमेरिकन कंपनीच्या आहारी गेल्याचा असाही पर्यावरणवाद्यांचा आरोप -या बियाण्यासाठी शेतकर्‍यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीवर अवलंबून राहावे लागेल, असे त्यांचे म्हणणे- बियाण्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढत असेल तर त्याला विरोध का करायचा, असे शेतकरी संघटनेचे उत्तर - कापसाच्या बीटी बियाण्यांमुळे शेतकर्‍याचे उत्पादन वाढल्याची आकडेवारी शेतीतज्ज्ञ देत आहेत - बीटी कॉटनमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत त्यामुळे हा फार्स आहे, असाही पर्यावरणवाद्यांचा युक्तीवाद

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2010 11:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2010 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close