S M L

सुरक्षा कडक, बुकिंग सुरू...

10 फेब्रुवारी'माय नेम इज खान'च्या विरोधात शिवसैनिकांनी आज 'राडा' सुरू केल्यानंतर सरकारनेही कडक भूमिका घेतली आहे. आम्ही आतापर्यंत बाराशे शिवसैनिकांना अटक केली आहे. सिनेमाचे बुकिंगही सुरू झाले आहे. तसेच थिएटर्सची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करणार असल्याचे गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केले आहे.सिनेमा रिलीज होणारच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर गृहमंत्री आर.आर. पाटील, अतिरिक्त गृहसचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक झाली. माय नेम इज खान सिनेमा 12 तारखेला रिलीज होणारच अशी भूमिका सरकारने घेतली आहे. तसेच पोलिसांना सर्व थिएटरबाहेर सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहारा आणि कॅमेरेदरम्यान पोलिसांनी आता सर्व थिएटर मालकांना काही निर्देश दिले आहेत. यात मुख्य प्रवेश द्वाराजवळ पहारा वाढवणे तसेच थिएटरच्या बाहेर आणि आत कॅमेरे लावावेत, असे पोलिसांचे निर्देश आहेत. तसेच पहिल्या 3 रांगा रिकाम्या ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत. 'सरकार समर्थ'दरम्यान शिवसेनेने जनतेला वेठीला धरू नये. सरकार सुरक्षा पुरवण्यासाठी समर्थ आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा सांगितले आहे. 'मुख्यमंत्री पगारी नोकर'उद्धव ठाकरे यांची सुरक्षा काढून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री हे पगारी नोकर आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.'आम्ही संरक्षण देऊ'तर दुसरीकडे शिवसेनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आरपीआयने दिला आहे. शाहरुखच्या सिनेमाला आरपीआयचे कार्यकर्ते संरक्षण देतील, असे आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2010 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close