S M L

‘ते’ मानवी अवशेष शीना बोराचेच, फॉरेन्सिक तज्ज्ञांचं शिक्कामोर्तब

Samruddha Bhambure | Updated On: Nov 19, 2015 02:17 PM IST

IndiaTva52577_Sheena

19 नोव्हेंबर : पेणजवळच्या जंगलात मिळालेले मानवी अवशेष हे शीना बोराचेच आहेत, हे आता स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील एम्सच्या फॉरेन्सिक टीमने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर एम्सच्या फॉरेन्सिक टीमच्या अधिकार्‍यांनी गागोदे खुर्दमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे नमुने घेतले होते. त्यावर चाचण्यांनंतर हे अवशेष शीना बोराचेच असल्याचा अहवाल सीबीआयकडे देण्यात आला. फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर आता सीबीआय या प्रकरणी तीन आरोपींविरूद्ध लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि शीना बोरा हिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीचे दुसरे पती संजीव खन्ना आणि तिचा ड्रायव्हर श्याम राय यांना मुंबई पोलिसांनीच अटक केली होती. हे सर्व सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2015 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close