S M L

राम मंदिर उभारणं, हीच अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली -भागवत

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2015 07:42 PM IST

mohan bhagwat23 नोव्हेंबर : सरसंघचालक मोहन भागवत यांना राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर उभारणं, हीच अशोक सिंघलांना खरी श्रद्धांजली असेल असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.

दिल्लीत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात सरसंघचालक बोलत होते. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणं हे सिंघल यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं. भागवतांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं भागवतांच्या या वक्तव्यावर टीका केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2015 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close