S M L

मग कोणत्या देशात जाणार ?, भाजपचा आमिरला सवाल

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2015 05:37 PM IST

मग कोणत्या देशात जाणार ?, भाजपचा आमिरला सवाल

24 नोव्हेंबर : अभिनेता आमिर खानच्या देश सोडण्याच्या वक्तव्यामुळे वादंग पेटलाय. भाजपने आमिर खानच्या वक्तव्याचा समाचार घेत कोणत्या देशात जाणार ? असा सवाल केलाय. भाजपचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आमिर खानवर टीका केली. हा अतुल्य भारत आहे त्याची प्रतिमा खराब करू नका असा टोला शाहनवाझ हुसेन यांनी लगावला.

शाहनवाज खान यांनी पत्रकार परिषद घेऊन आमिर खानच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. आमिरने कोणत्याही कट कारस्थानाला बळी पडू नये. आमिरने असं वक्तव्य करून देशातील नागरिकांच्या मनात भिती घालत आहे आणि देशाची प्रतिमा खराब होत आहे. आमिरने हे विसरु नये की याच देशाने त्यांना सुपरस्टार बनवलंय. या देशाने त्यांना भरभरून प्रेम दिलंय. हा अतुल्य भारत आहे त्याची प्रतिमा खराब करु नका असे खडेबोल शाहनवाज यांनी आमिरला सुनावले. तसंच मुस्लिमांसाठी भारत हा उत्तम आणि सुरक्षित देश आहे. त्यामुळे आमिर खान हा देश सोडून कुठे जाणार ? जिथे जाणार तिथे असहिष्णुता असणारच आहे असंही शाहनवाझ म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राहुल गांधींकडे वळवला. राहुल गांधींनी आमिरच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. मुळात काँग्रेसला देशाचं वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न आहे अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2015 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close