S M L

देशभरात संविधान दिवसाचा जागर

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2015 01:49 PM IST

देशभरात संविधान दिवसाचा जागर

26 नोव्हेंबर : आज देशभर संविधान दिवस साजरा होतोय.भारताच्या इतिहासात 26 नोव्हेंबर या दिवसाला ऐतिहासिक महत्व आहे. कारण, आजच्या दिवशी 66 वर्षांपूर्वी... 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली होती. आणि 26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आली.

शेकडो वर्षांची गुलामगिरी, हजारो वर्षांच्या जातियतेत अडकलेला भारत, लोकशाही प्रजासत्ताक बनलं. सामान्य माणसाला घटनेनं नवं आत्मभान दिलं. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय या राज्यघटनेतील तत्वांमुळं भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते.

संसदेतही संविधान दिन साजरा होतोय. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवनात 'संविधान तयार होताना या प्रदर्शनाचं उदघाटन केलं. या प्रदर्शनात संविधानाची मूळ प्रत, जुने फोटोग्राफ्स, दुर्मिळ कागदपत्र आणि काही वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी यानिमित्त भारतीय संविधानाच्या मूळ प्रतिची पाहणी केली. यापुढे दरवर्षी संविधान दिन साजरा केला जाणार आहे.

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये

घटना समितीची स्थापना - जुलै 1946

घटना समितीचे प्रमुख सदस्य

- डॉ.राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर, कन्हैयालाल मुन्शी आणि सरोजिनी नायडू

- 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड

- 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड

- घटना समितीचे कामकाज एकूण 1082 दिवस चालले

- 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीने संविधानाला मान्यता दिली

- 24 जानेवारी 1950 ला संविधान समितीची अखेरची बैठक झाली

- 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2015 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close