S M L

संविधानात बदल करणं म्हणजे आत्महत्या ठरेल -पंतप्रधान मोदी

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2015 09:14 PM IST

संविधानात बदल करणं म्हणजे आत्महत्या ठरेल -पंतप्रधान मोदी

27 नोव्हेंबर : संविधानात बदल म्हणजे आत्महत्या ठरेल, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेक्युलर या शब्दावरून कालपासून जो वाद सुरू झाला होता त्यावर पडदा टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत राज्यघटनेवरच्या चर्चेचा समारोप केला.

मोदींच्या भाषणापूर्वी संसदेत गदारोळ झाला. पंतप्रधान भाषणात काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण मी उत्तर देणार नाही. लोकसभेत मीही इतर सदस्यांप्रमाणेच एक सदस्य आहे. त्यामुळे संविधानाविषयी मीही इतर सदस्यांप्रमाणेच चर्चा करण्यासाठी उभा आहे असं सांगत पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. तसंच ही चर्चा आपली आहे, मी आणि तू या वादातली नाही. या संविधानाचा आपण जितका गौरव करु तितका कमीच आहे. अनेक लोकांच्या तपस्येने देशाची प्रगती झालेली आहे. काही लोकांनी आयुष्यात इतक उंची गाठली आहे. की त्यांचं नाव घेतलं नाही तरी त्यांचं कर्तृत्व कमी होत नाही. देशाचं संविधान तयार करणं हे खूप मोठं काम आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संविधानाची शक्ती आणि संविधानातल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. आणि संविधानाची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मोदी म्हणाले. तसंच, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाही उल्लेख मोदींनी यावेळी बोलताना केला. बाबासाहेबांनी आयुष्यभर अवहेलना सहन केली मात्र संविधानात त्यांनी कधीही सूडाची भावना येऊ दिली नाही त्यामुळे त्यांची भूमिका कुणीच नाकारू शकत नाही असंही ते म्हणाले. भाषणाच्या अखेरीस मोदींनी 'आयडिया आॅफ इंडिया'चा नारा देत भाषणाची सांगता केली. संविधानावर सर्व सदस्यांनी चर्चा केली याबद्दल मोदींनी सर्वांचे आभारही मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2015 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close