S M L

'माय नेम इज फॅन'

12 फेब्रुवारी'माय नेम इज फॅन' असे म्हणत माय नेम इज खान या सिनेमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुखने आपल्या फॅन्सचे मनापासून आभार मानले आहेत. सध्या बर्लिनमध्ये असलेल्या शाहरुखने ट्विटर या सोशल नेटवर्किंगवरून चाहत्यांशी संवाद साधला आहे.शाहरुख म्हणतो- माझ्या प्रिय देशवासियांनो... जर माझ्या शब्दांमुळे किंवा कृत्यामुळे कळत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. ऍण्ड आय लव्ह यू व्हेरी व्हेरी व्हेरी व्हेरी मच. थँक यू थँक यू थँक यू...तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. तुम्हाला या सार्‍याचा ताण दिल्याबद्दल दिलगिरी. आता मला मन भरून येतं म्हणजे काय होतं ते आता समजतंय...मला आज कळलं की मी फक्त फिल्मी हिरो आहे. पण खरे हिरो तुम्ही आहात. कारण आज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला आहे. हॅट्स ऑफ टू ऑल हिरोज...मी वचन देतो, मी आता फक्त सुंदर सुंदर फिल्म्स बनवेन आणि ज्या माझ्या फिल्म्स तुमच्या मनासारख्या नव्हत्या त्याबद्दल सॉरी !मी किती बडबडतोय ! मी पहिल्यांदाच इतका फॅन बनलोय, प्रेक्षकांचा मी फॅन आहे. तुम्हाला मिठी मारावीशी वाटतेय. तुम्ही सगळे रॉकस्टार्स आहात.मी तुम्हाला फोटो देईन, सही देईन आणि माझ्या हृदयात कायम ठेवेन... माय नेम इज फॅन ! आय ऍम नॉट अ स्टार, तुम्ही खरे स्टार आहात...आजच्या धांदलीत तुम्हाला त्रास झाला असेल, म्हणून शाहरुखने चाहत्यांची माफी मागितली आहे. धमकावणार्‍या शिवसेनेची मात्र त्याने चुकूनही माफी मागितलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2010 01:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2010 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close