S M L

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 188 बळी

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 01:40 PM IST

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 188 बळी

02 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये पावसामुळे हाहाकार माजलाय. राज्याच्या अनेक भागांमधलं जनजीवन विस्कळीत झालंय. रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्यानं तुंबले आहे. शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. चेन्नईत तर अनेक ठिकाणी आता रस्ते खचायला लागले आहे. त्यामुळे पाण्यातून वाट काढत जाणार्‍या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

चेन्नईत अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झालाय. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये पावसानं 188 जणांचा बळी घेतला आहे. आता परिस्थिती इतकी बिकट झालीय की लष्कर आणि नौदलाला बचावकार्यात जुंपण्यात आलंय. पण लष्कराच्या आणखी टीम्स पाठवण्यात अडचणी येत आहे. हवामान खराब आहे, आणि विमानतळही बंद आहे. एनडीआरएफच्या 10 टीम्स आधीपासूनच कार्यरत आहेत.

विमानसेवा ठप्प

रस्ते आणि रेल्वे वाहतुकीबरोबर आता विमानसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. चेन्नईला जाणारी आणि तिथून निघणारी विमानं सध्या बंद आहेत. याचं कारण म्हणजे रनवेवर पाणी साचलंय. आणि विमान उडवण्यासाठी लागणारी किमान visibility ही कमी झाली आहे. यामुळे मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमधून चेन्नईला जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहे. इंडिगो, स्पाईसजेट, एअर इंडिया या एअरलाईन्सची विमानं रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना 7-8 तास विमानतळावर काढावे लागतायत.

सोशलमीडियावर मदतीची हाक

चेन्नईत पूरस्थितीत काही नागरिक सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत आहे. विविध शहरांमधले हेल्पलाईन नंबर्स, ब्रेड आणि खाण्याचे इतर पदार्थ पुरवणार्‍या वेबसाईटस् हे सगळं लोक शेअर करत आहे. एवढंच नाही तर काही जण आपण इथं अडकलोय, कृपया पोलिसांना सांगा, असे मेसेजेसही ट्विटरवर टाकतायत. पुरग्रस्तांना मदतीची आवाहनंही इथून केली जात आहे. '#ChennaiFloods' हा हॅशटॅग सकाळपासून पहिल्या नंबरवर ट्रेंड होतोय.

आंध्रही पाण्यात

तामिळनाडू बरोबरच दक्षिण आंध्र प्रदेशमध्येही पूर आलाय. प्रकासम आणि चित्तूर जिल्ह्यांना सर्वात जास्त पुराचा फटका बसलाय. शेतीचं खूप नुकसान झालंय. काही शेतकर्‍यांची जनावरंही वाहून गेली आहे. शेतीच्या औजारांचंही नुकसान होतंय. पुरस्थिती इतकी भीषण आहे की मदतही पोहचवता येत नाहीय. रस्ते बंद झाले आहे. नदीनाले दुथडी भरून वाहतायत. त्यामुळे मदत पोहचवणे, आणि लोकांना वाचवणे, ही कामं करायची तरी कशी, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close