S M L

शरद पवारांचा दिल्लीत सत्कारसोहळा, मोदी आणि सोनिया गांधी राहणार उपस्थित

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2015 09:05 AM IST

शरद पवारांचा दिल्लीत सत्कारसोहळा, मोदी आणि सोनिया गांधी राहणार उपस्थित

10 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवी दिल्लीत त्यांचा आज (गुरुवारी) सत्कार होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुख्यर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं सगळ्यांचं लक्षं या कार्यक्रमाकडं लागलंय.

विज्ञान भवनात संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात `लोक माझे सांगाती` हे मराठी आणि `ऑन माय टर्म्स` हे इंग्रजी आत्मकथनपर पुस्तकं प्रसिद्ध होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2015 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close