S M L

स्टिम्युलस पॅकेजचे काय होणार?

15 फेब्रुवारीयेत्या 26 फेब्रुवारीला युपीए सरकारचे आर्थिक वर्ष 2010 - 11 साठीचे बजेट सादर होणार आहे. 2009च्या बजेटवर सावट मंदीचे सावट होते. त्यामुळे स्टिम्युलस पॅकेज, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुदतीत वाढ अशा बाबींची तरतूद करण्यात आली होती. आत्ता या बजेटमध्ये काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. स्टिम्युलस पॅकेज मागे घेणार?यावर्षी अर्थव्यवस्था मंदीतून सावरत आहे. त्यामुळे स्टिम्युलस पॅकेज मागे घेण्याची हीच वेळ असल्याचे माँटेक सिंग अहलुवालिया आणि सी. रंगराजन यांनी बोलून दाखवले आहे. पण हे पॅकेज मागे घेतले तर त्याचा परिणाम होईल एक्स्पोर्ट्स, टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांवर होणार आहे.घरांचा तुडवडा2009च्या बजेटने पायभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. पण देशात सामान्यांसाठीच्या घरांचा तुडवडा आहे. त्यामुळे हाऊसिंग सेक्टरवर बजेटचे लक्ष असणार आहे.सामान्यांसाठी इन्कम टॅक्समधून अधिक करमुक्त उत्पन्न मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तर उद्योगांसाठी एक्साईज ड्युटीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.महागाईवर काय उपाय?पण या बजेटमध्ये सगळ्यात मोठा भर असेल तो महागाईवर. 2009चे बजेट 'आम आदमी'चे बजेट म्हणत सादर केले गेले. आता या बजेटमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना होणार याकडे सामान्यांचेच नाही, तर विरोधकांचेही लक्ष आहे.प्रगतीचे आव्हानवाढत चाललेली वित्तीय तूट सांभाळतानाच अर्थव्यवस्थेची प्रगती कायम ठेवण्याचे आव्हान अर्थमंत्री प्रवण मुखर्जी यांना हे बजेट 2010 सादर करताना पेलावे लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2010 01:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close