S M L

सात वर्षांत जपान बुलेट ट्रेन बनवून देणार,जपान-भारतात करार

Sachin Salve | Updated On: Dec 12, 2015 05:42 PM IST

सात वर्षांत जपान बुलेट ट्रेन बनवून देणार,जपान-भारतात करार

12 डिसेंबर : अहमदाबाद ते मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनवर आज शिक्कामोर्तब झालंय. बुलेट ट्रेनच्या महत्त्वपूर्ण करारावर भारत-जपानमध्ये करार झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये करारवर स्वाक्षर्‍या केल्या. या करारनुसार 7 वर्षांत जपान बुलेट ट्रेन तयार करून देणार आहे. या प्रकल्पासाठी 98,000 कोटी मंजूर करण्यात आले आहे.

भारत दौर्‍यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रोटोकाल बाजूला सारून दिली विमानतळावर स्वत:हा जाऊन केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीतील हैदाराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बुलेट ट्रेनसह इतर महत्त्वाच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्यात. संरक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण करार करण्यात आलाय. तसंच रेल्वेच्या विकासासाठी जपान 12 अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. तर भारतात बनवलेल्या मारुती गाड्या जपानमध्ये विकण्यासाठी दार मोकळे झाले आहे. तसंच अणुऊर्जा करारवरही स्वाक्षरी केली. शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर केला जाईन आणि हा करार फक्त व्यावयासयिक नसून स्वच्छ ऊर्जेसाठी असणार आहे असं यावेळी दोन्ही नेत्यांनी ग्वाही दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2015 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close