S M L

तीन वर्षांनंतर निर्भयाला आठवताना...

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2015 01:15 PM IST

तीन वर्षांनंतर निर्भयाला आठवताना...

delhi rape case16 डिसेंबर : देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिमा डागाळली गेली. देशाच्या राजधानीत एका तरुणीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर सहा नराधमांनी कौर्याची सीमा गाठत तरुणीवर अत्याचार केले होते. 11 दिवस मृत्यूशी झुंज देत निर्भयाने या जगाचा निरोप घेतला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. दिल्ली तर आंदोलनांनी आणि निदर्शनांनी पेटून उठली होती.

यानंतर महिलांवरच्या अत्याचाराविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याची गरज देशभरात व्यक्त झाली. अवघा देश जागा झाला आणि

महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करा, अशी मागणी करू लागला. पण तरीही निर्भयाबद्दलच्या दुर्घटनेनं आपल्याला आपली मानसिकता तपासून पाहायला लावली, आपल्या कायद्यांमध्ये बदल करायला लावले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीला देवी मानणारा आपला समाज खरंच स्त्रीला आदर देतो का या महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लावली.

3 वर्षांत काय बदललं ?

- महिलांवरच्या अत्याचाराविरुद्ध देशभरात जागृती

- भारतीय नागरिकांच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवण्याची गरज

- दिल्लीतल्या महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्सची स्थापना

- महिलांवरच्या अत्याचाराविरोधातले कायदे कडक करण्याची मागणी

- जस्टीस वर्मांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन

- कायदेतज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि नागरिकांची मतं जाणून घेऊन कायद्यामध्ये बदल

- कायद्याच्या कठोर अमलबजावणीसाठी सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंक्षणा सक्षम करण्यावर समितीच्या अहवालात भर

- बलात्कार करणार्‍याला जन्मठेप की फाशीची शिक्षा यावरून देशभरात वादविवाद

- अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून 16 करण्याच्या निर्णयाला समितीचा विरोध

अल्पवयीन आरोपीबद्दलच्या कायद्यात सुधारणा न झाल्याने आरोपीची सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2015 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close