S M L

भाजपचा पुन्हा रामजप

18 फेब्रुवारीभाजपला आता पुन्हा एकदा श्रीरामाची आठवण झाली आहे. राममंदिराचा मुद्दा भाजप सोडणार नाही अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. इंदूर इथे सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी यांनी हा रामनामाचा जप केला आहे. भाजप कधीही राम मंदीरचा मुद्दा सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले, 'राममंदिर हा आमचा आत्मा आहे. अयोध्येतील त्या जागेवरच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आहे. हे देशी आणि परदेशी शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. त्यामुळे ही जागा फक्त राममंदिर उभारणीसाठीच द्या. त्यासाठी मी मुस्लिम समाजालाही आवाहन करतो की, बाजूच्या जागेवर तुम्ही मशीद उभारा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.' आपल्या भाषणात गडकरींनी काँग्रेस आणि घराणेशाही असणार्‍या पक्षांवर टीका केली. माझे वडील,आजोबा कोणीच पंतप्रधान नव्हते. मी एका सामान्य शेतकर्‍याचा मुलगा आहे. तरी मी भाजप अध्यक्ष झालो. सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे भाजपमध्येच घडू शकते, असा दावाही त्यांनी केला. गडकरींच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवा, असे आवाहन माजी अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी यावेळी केले. आज अधिवेशनात राष्ट्रीय सुरक्षा, गंगा नदी प्रदुषण, धर्मांतर या विषयांवर चर्चा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2010 09:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2010 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close