S M L

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीला अज्ञातस्थळी हलवलं

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2015 01:32 PM IST

निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीला अज्ञातस्थळी हलवलं

19 डिसेंबर : निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन दोषीला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे. माझ्या जीवाला धोका आहे, असं या दोषीनं जुव्हेनाईल जस्टीस बोर्डाला सांगितलं होतं. त्यामुळे त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलं. त्याची उद्या सुटका होणार आहे.

2012 साली देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणाला काही दिवसांपूर्वीच तीन वर्ष पूर्ण झाली. याप्रकरणी पाच आरोपांनी अटक करण्यात आली होती. त्यातील एकाने जेलमध्ये आत्महत्या केली. तर चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. या प्रकरणात कौर्याची सीमा गाठणार्‍या अल्पवयीन दोषीने निर्भयावर अत्याचार केले होते. हा दोषी आता रविवारी जेलबाहेर येणार आहे. पण, आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. उद्या त्याची सुटका जरी असली तरी ही पूर्णपणे सुटका नसेल, कारण एक सरकारी समिती त्याच्या हालचाली आणि वागुकीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2015 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close