S M L

बनावट कंपन्यांना डीडीसीएने दिले पैसे- किर्ती आझाद

Samruddha Bhambure | Updated On: Dec 20, 2015 08:20 PM IST

बनावट कंपन्यांना डीडीसीएने दिले पैसे- किर्ती आझाद

20 डिसेंबर : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी आज (रविवरी) दिल्ली क्रिकेट असोसिएनशन घोटाळयांसंदर्भात पत्रकारपरिषद घेऊन अनेक आरोप केले. पत्रकार परिषदेदरम्यान किर्ती आझाद यांनी विकीलींक्स इंडियाचा व्हिडीओ दाखवला. यामध्ये डीडीसीएशी संदर्भात 14 बनावट कंपन्या समोर आल्या आहेत. या कंपन्यांना कोट्यावधी रुपये देण्यात आले पण त्यांचं काम सांगितलेले नाही.

डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्ये फेरफार करायचे असे आरोप किर्ती आझाद यांनी केला. तसंच, डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या काही कंपन्यांना कंत्राट दिले, यामध्ये लोक तेच पण कंपनीचे नाव बदलले जात होते, अशी माहितीही कीर्ती यांनी दिली.

माझं अरुण जेटलींशी कोणतही वैर नाही. आमची लढाई व्यक्तिगत नसून, भ्रष्टाचाराविरुध्द आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा फॅन आहे, असंही आझाद म्हणाले. या पत्रकार परिषदेला बिशन सिंग बेदीहे देखील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2015 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close