S M L

निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची अखेर सुटका

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2015 07:49 AM IST

निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची अखेर सुटका

20 डिसेंबर  : निर्भया प्रकरणातील अल्पपवयीन आरोपीची आज (रविवारी) संध्याकाळी अखेर सुटका करण्यात आली. या सुटकेचा निषेध नोंदवत शेकडो नागरिकांनी इंडिया गेट आणि राजपथावर जोरदार निदर्शने केली.

अल्पवयीन आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव एका सामाजिक संस्थेकडे सोपवण्यात आलं असून त्याची नवी ओळख आणि ठिकाणा उघड केला जाणार नाही. याआधी निर्भयाच्या आईनं गुन्हेगाराला सोडू नये यासाठी बालसुधारगृहाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी निर्भयाच्या आईला ताब्यात घेऊन थोड्या वेळानं सोडलं.

या सुटकेच्या विरोधात राजपथवर निदर्शने करण्यात येत आहेत. निर्भयाचे आई-वडिलही इंडिया गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. मात्र पालकांना विरोध करत पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी इंडिया गेटच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. जमावबंदीला न जुमानताही नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे.

दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला स्थगिती मिळवण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी रात्रीच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2015 08:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close