S M L

अरुण जेटलींचा केजरीवालांवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2015 02:06 PM IST

अरुण जेटलींचा केजरीवालांवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

21 डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आम आदमी पक्षाच्या नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली हायकोर्टात जेटलींनी 10 कोटींचा दाखला दाखल केला.

आपनं काही दिवसांपूर्वी दिल्ली क्रिकेट असोसिएनशनवरून जेटलींवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले होते. जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना तिथे अनेक गैरव्यवहार झाले, आणि त्यामुळे त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी जेटलींची आहे, असं आपचं म्हणणं आहे. तर भाजपनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

विशेष म्हणजे, भाजपचे खासदार किर्ती आझादही दिल्ली क्रिकेट असोसिएनशनवर गंभीर आरोप केले होते.डीडीसीएमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना कंत्राटांसाठी पैसे देण्यात आले, त्यांचे पत्ते खोटे आहेत, आणि काही कंपन्याच बोगस आहेत, त्या अस्तित्वातच नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला. मी मोदींचा फॅन आहे. माझं अरुण जेटलींशी कोणतही वैर नाही. मला फक्त भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचंय, असंही आझाद म्हणाले होते. त्यामुळे भाजप आता किर्ती आझाद यांच्यावर काही कारवाई करते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close