S M L

राम मंदिराच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2015 04:15 PM IST

 राम मंदिराच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

23 डिसेंबर : राज्यसभेत आज पुन्हा गदारोळ सुरू आहे. मुद्दा आहे राम मंदिराचा. काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये 2 ट्रक भरून शिला आल्या होत्या. आणि त्यानंतर त्या शिलांना घडवण्याचं काम सुरू आहे. याच मुद्द्यावरुन आज राज्यसभेत गदारोळ झाला.

काँग्रेस, बीजेडी, आणि डावे पक्ष सरकारवर तुटून पडले. 2017 साली होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप वातावरण तापवतंय, असा आरोप जेडीयूनं केला आहे. तर सरकारच्या बाजूनं मुख्तार अब्बास नक्वींनी उत्तर दिलं. शिला आल्या म्हणजे राम मंदिर बनलं असं नाही. तो मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, आणि सरकार न्यायालयाचा आदर करतं, असं नक्वी म्हणाले. शिला आणण्याचं काम 1990 पासून सुरू असल्याचंही नक्वी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2015 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close