S M L

कीर्ती आझाद यांना पाठिंबा द्यायला अडवाणी, मुरली मनोहर जोशींची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Dec 24, 2015 10:24 PM IST

कीर्ती आझाद यांना पाठिंबा द्यायला अडवाणी, मुरली मनोहर जोशींची बैठक

24 डिसेंबर : खासदार कीर्ती आझाद यांच्यावर भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र जमून चर्चा केली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत कीर्ती आझाद यांच्यावर पक्षाकडून करण्यात आलेली निलंबनाची कारवाई आणि पक्षनेतृत्त्वासंदर्भात चर्चा झाल्याचं समजते.

आज दुपारच्या सुमारास अडवाणी, शांता कुमार आणि सिन्हा मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जमले आणि त्यानंतर या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीचा नेमका तपशील सांगण्यास या नेत्यांनी नकार दिला. आम्ही भेटलो आणि चहा घेतला, अशी प्रतिक्रिया कुमार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, पक्षातून निलंबित झालेल्या कीर्ती आझाद यांची पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात रवानगी होणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी बिहार निवडणुकांतील भाजपच्या दारूण पराभवानंतर 10 नोव्हेंबरला या ज्येष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन पक्षनेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्रक जारी केले होते. मात्र, यावेळच्या बैठकीनंतर ज्येष्ठांकडून तशाप्रकरची कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2015 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close