S M L

नवीन वर्षात जाहीर करणार ‘स्टार्टअप इंडिया’चा अॅक्शन प्लॅन- मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 27, 2015 09:28 PM IST

modi man ki baat

27 डिसेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशवायसियांना नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच स्वच्छतेच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. देशातील युवकांसाठी 'स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया' या योजनेचा ऍक्शन प्लान येत्या 16 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. तसंच या योजनेमुळे युवकांना मोठया संधी मिळाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्या पर्यटनाचा काळ असल्याने जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्यावर भर द्यायला हवा. पर्यटनस्थळांवरील स्वच्छ वातावरणामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात 'स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया' या योजनेची घोषणा केली होती याची आठवण करून देत या महत्त्वकांक्षी योजनेचा आराखडा येत्या 16 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे. या योजनेत देशातील युवकांना मोठी संधी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सामान्य माणूस बँकाकडे जात नव्हता. मात्र, मुद्रा योजना आणल्यानंतर सहजतेने कर्ज उपलब्ध होऊ लागलो. आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून 40 कोटी रूपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं. डीबीटीएस, थेट लाभ हस्तांतरण योजनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं असून, या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. तुमच्या मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी ऍप डाऊनलोड करून थेट माझ्यासोबत कनेक्ट रहा. तुमच्या चांगल्या कल्पना, विचार मला कळवा, त्याचं स्वागत करू, असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं.

दरम्यान नॅशनल युथ फेस्टीव्हलसाठी त्यांनी युवकांना आपले मत लिहून पाठवावे, असे आवाहन मोदींनी केले. तसेच 26 जानेवारीसाठी नागरिकांनी राज्यघटनेत दिलेल्या कर्तव्यावर काव्यरचना आणि निबंधस्वरुपात काहीतरी लिहून पाठवावे, असेही आवाहन मोदींनी केलं. तसंच, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाल्याचेही मोदींनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2015 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close