S M L

महिला आणि दुचाकींना 'ऑड-ईवन'मधून का वगळले? - दिल्ली हायकोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2015 09:48 PM IST

delhi odd even car

30 डिसेंबर : दिल्लीत 'ऑड-ईवन'हा नवीन वाहतूक नियम 1 जागेवारीपासून दिल्लीत लागू होणार आहे. मात्र, यातून महिला आणि दुचाकींना का वगळण्यात आले असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाकडून सरकारला विचारण्यात आला आहे.

दिल्लीत 1 ते 15 जानेवारीदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर हा नियम लागू होणार आहे. हा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून दिल्ली सरकारकडून जोरात प्रयत्न चालू आहेत. यासाठी सरकारने 66 टीम बनविले असून, पोलिसांनी सांगितलेल्या 200 जागांवर टीम काम करणार आहे. याबाबत दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय आणि दिल्लीचे कमिश्नर यांची बैठक झाली आहे.

रिक्षा चालकांची मनमानी, सुट्टे पैसे, अधिक पैसे घेणे अशा प्रकारच्या घटणेवर संपूर्ण टीम लक्ष ठेवणार आहे. तसेच पोलिसांना मदतीला उपस्थित राहणारे नसीसी आणि एनएसएसच्या टीमला यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावर सरकार काय उत्तर देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2015 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close