S M L

नोकरी सोडायची तर 50 लाख भरा, एअर इंडियाचा कर्मचार्‍यांना दणका

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2016 04:35 PM IST

नोकरी सोडायची तर 50 लाख भरा, एअर इंडियाचा कर्मचार्‍यांना दणका

01 जानेवारी 2015 : एअर इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांना नव्या वर्षाची भेट देत चांगलाच धक्का दिलाय. 5 वर्षांच्या आत नोकरी सोडायची असेल, तर एकूण 50 लाख रुपये भरा असा नियमच केला आहे. आधीही रक्कम 10 लाख होती पण ती आता 4 पट्टीने वाढवलीये.

नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहणार्‍या एअर इंडियानं पायलटस्‌साठी कडक नियम केला आहे. 5 वर्षांच्या आत नोकरी सोडायची असेल, तर एकूण 50 लाख रुपये आता भरावे लागणार आहेत आधीही ही रक्कम 10 लाख होती पण पायलटस्‌ना घेणारी एअरलाईन ही रक्कम आरामात भरून टाकायची. त्यामुळे आता हा दंड 50 लाख केलाय. होतं असं की, एअर इंडिया पायलटस्‌च्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च करते आणि अवघ्या काही महिन्यांत किंवा वर्षात हे पायलट दुसर्‍या एअरलाईनमध्ये जातात. त्यामुळे त्यांच्यावर एअर इंडियानं खर्च केलेले पैसे वसूल होत नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2016 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close