S M L

पठाणकोट हल्ल्यामागे पाकचा हात ?, पाचही दहशतवाद्यांचा खात्मा

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2016 10:15 PM IST

पठाणकोट हल्ल्यामागे पाकचा हात ?, पाचही दहशतवाद्यांचा खात्मा

Pathankot_attack_new02 जानेवारी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांनी डोकंवर काढत पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला चढवलाय. दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील सैन्याच्या हवाई तळावर हल्ला केला. तळावरील हेलिकॉप्ट, लढाऊ विमानांना उद्‌ध्वस्त करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता.मात्र, भारतीय जवानांनी चोख उत्तर देत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. या चकमकीत मात्र, 4 जवानांना वीरमरण आलं. शुक्रवारी रात्री सुरू झालेले कारवाई दुसर्‍या दिवशी संध्याकाळी संपली. या सर्व दहशतवाद्यांना पाकमधून आदेश दिले होते त्यामुळे या हल्लामागे पाकचा हात होता असा निष्कर्ष भारतीय गुप्तचर यंत्रणेनं काढलाय.

भारत-पाकिस्तान सीमेपासून 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या पठाणकोट येथील सैन्याच्या हवाई तळावर शुक्रवारी मध्यरात्री लष्करी वेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दहशतवाद्यांनी आधी पंजाबचे पोलीस अधिक्षक सलविंदर सिंग यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण केले होते. त्यावेळीच पंजाबसह काश्मिरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. घटनेनंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारीही करण्यात आला. अखेर ज्याची शक्यता नव्हती तेच घडलं.

लष्करी वेशात आलेले दहशतवादी पहाटे तीन वाजता एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसले आणि बेछुट गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर तुफान गोळीबार केला.जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. पहिल्या दोन तासांत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकीदरम्यान 2 जवानही शहीद झाले. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल नियंत्रण कक्षात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेचा आढावा घेतला.

सकाळी 8.30 वाजता एअरफोर्स स्टेशनमध्ये पुन्हा गोळीबार सुरू झाला. तब्बल 5 तास चकमक सुरू होती. या चकमकीत आणखी 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. संपूर्ण स्टेशनाला जवानांनी घेराव घातला. 2 हेलिकॉप्टरमधून हल्लाग्रस्त परिसराची पाहणी करण्यात आली. एअरफोर्स स्टेशनमध्ये लपून बसलेला एका दहशतवादी अधूनमधून गोळीबार करत होता. जवानांनी सर्च ऑपेरशन हाती घेत संध्याकाळी या पाचव्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात केला. या संपूर्ण चकमकीत 4 जवान शहीद झाले तर जण 5 जखमी झाले. जवानांच्या या शौयाबद्दल राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

दहशतवादी हल्ला पूर्वनियोजित, पाकचा हात ?

पठाणकोटमधला दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित असल्याची माहिती मिळतीये. हा कट आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मदने मिळून आखला असल्याचा दाट संशय आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सर्व दहशतवादी हे प्रशिक्षित होते. हे सगळे दहशतवादी मुलतानी, बहावलपूरचे रहिवासी आहेत. हल्ला झाला तेव्हा ते एकमेकांशी पंजाबी भाषेत बोलत होते. या दहशतवाद्यांनी पाकमधील सूत्रधारांशी चार वेळा संभाषण केलंय अशी माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली.

पठाणकोठ हवाई तळावर दहशतवादी हल्ला

- लष्कराचं सर्च ऑपरेशन समाप्त

- सर्वच्या सर्व 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

- लष्कराचे 4 जवान शहीद, 5 जखमी

- 30 डिसेंबरला दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी

- दहशतवादी आणि सुत्रधारामध्ये 4 वेळा संभाषण झालं

- मध्यरात्री 12.30 ते 2.30 च्या दरम्यान संभाषण

- पाकमधून दहशतवाद्यांना हल्लाचे निर्देश

- पठाणकोठच्या हवाई तळात शिरण्याचे आदेश

- तळावरील विमान, चॉपर्स नुकसान करण्याचे आदेश

- सर्व दहशतवादी पंजाबीमध्ये बोलत होते

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2016 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close