S M L

पठाणकोट हल्ला: 72 तासांनंतरही चकमक सुरूच

Samruddha Bhambure | Updated On: Jan 4, 2016 11:56 AM IST

पठाणकोट हल्ला: 72 तासांनंतरही चकमक सुरूच

04 जानेवारी : गेल्या दोन दिवसांपासून पंजाबमधील पठाणकोटच्या हवाईदलाच्या तळावर (एअरबेस) लपलेल्या दहशतवाद्यांनी आज सोमवारी सकाळी पुन्हा हल्ला केला आहे. हवाईदलाच्या इमारतीतून आधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. याला भारतीय जवान प्रत्युत्तर देत असून, दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी जवानांनी स्फोट घडवून आणला आहे.

एक किंवा जास्त अतिरेकी परिसरातच दडून बसल्याचा संशय असून ते अधूनमधून हल्ले करत आहे. दहशतवाद्यांना शोधासाठी कमांडोंनी कोम्बिंग ऑपरेशन पुन्हा सुरू केलं आहे. सुरक्षेच्या कारणांसाठी लष्कराकडून आणखी सध्या कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही आहे. हवाईदलाच्या तळावर अद्ययावत विमानं, इंधनसाठा, आणि इतर यंत्र सामुग्री असल्यामुळे जी चकमक सुरू आहे, ती अतिशय काळजीपूर्वक करावी लागत आहे.

दुसरीकडे, या चकमकीत एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार शहीद झाले. ठार मारण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह हटवताना मृताखाली ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. यात निरंजन यांच्यासह तीन जवान जखमी झाले. उपचारांदरम्यान निरंजन यांचा मृत्यू झाला. या चकचकीत आत्तापर्यंत एकूण 5 दहशतवादी ठार झाले असून 7 जवान शहीद तर 20 जण जखमी झाले आहेत. शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close