S M L

पठाणकोटमध्ये ‘सर्च ऑपरेशन’ सुरू - एनएसजी अधिकारी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 4, 2016 04:43 PM IST

पठाणकोटमध्ये ‘सर्च ऑपरेशन’ सुरू - एनएसजी अधिकारी

04 जानेवारी : पठाणकोटमध्ये अद्याप सर्च ऑपरेशन सुरूच आहे. हवाईतळाचा कोपरा अन् कोपरा तपासून ऑपरेशन संपल्याची अधिकृत घोषणा करू, असं लष्कराकडून सांगण्यात आलं. पठाणकोट हवाईतळावर आज NSG, सेना आणि एअरफोर्सच्या अधिकार्‍यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.

अतिरेक्यांसोबत अद्याप चकमक सुरूच आहे. एका दोन मजली इमारतीत आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. लष्कर, जवान आणि एनएसजीचे कमांडो कसून तपास करत असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं. तसंच ज्या इमारतीत दहशतवादी लपल्याची शक्यता आहे, ती रहिवाशी इमारत आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान गोळीबार आणि स्फोट झाला असला तरी तळावरील सर्व कुटुंबे सुरक्षित असल्याची माहिती एनएसजी आणि हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

पठाणकोटच्या हवाई तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला.पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी घुसून त्यांनी गोळीबार केला. तेव्हापासून सुरु झालेली ही चकमक अद्यापही थांबलेली नाही. या चकमकीत भारताचे सात जवान शहीद झाले असून कालपर्यंत पाच दहशतवाद्यांना ठार केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. तसंच पठाणकोट हवाईतळावर नेमके किती अतिरेकी घुसले, याबाबतचा अधिकृत आकडाच अद्याप समजू शकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close