S M L

पठाणकोटमध्ये गोळीबार थांबला, ऑपरेशन सुरूच

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2016 12:33 PM IST

पठाणकोटमध्ये गोळीबार थांबला, ऑपरेशन सुरूच

05 जानेवारी : पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला गोळीबार आज (मंगळवारी) सकाळपासून थांबला. सुरक्षा दलाच्या जवानांकडून या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत असून, अजून कुठे दहशतवादी दडून बसले आहेत का, याचाही शोध घेण्यात येत आहे. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इथे सुरू असलेलं कोम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.

शनिवारी सकाळी या तळाच्या परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कर, एनएसजी आणि हवाई दलाचे गरूडा पथक यांचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट इथल्या स्थितीचा उच्चस्तरीय बैठकीत सोमवारी आढावा घेतला.

हवाईतळाच्या मागील बाजूस घनदाट जंगल असून, तेथून हे दहशतवादी घुसले होते, त्यामुळे त्यांचा माग काढणं कठीण जात असल्याचं असं एनएसजीच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.

 पठाणकोट हल्ल्याची रणनीती

- 26/11चा हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांपेक्षाही पठाणकोटचे दहशतवादी जास्त प्रशिक्षित होते

- दारूगोळा 3 दिवस पुरेल अशा पद्धतीनं वापरून त्यांनी हा हल्ला केला

- शनिवारी पहाटे 3 वाजता हा हल्ला सुरू झाला. यावेळी माणसाची सतर्कतेची पातळी सर्वात कमी असते

- खूप वेळ गोळीबार बंद करायचे, त्यामुळे दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका येऊ शकते

- या सर्व क्लुप्त्या फक्त लष्करी अधिकारी आणि जवानांनाच माहिती असतात

- म्हणूनच, दहशतवाद्यांना कोणत्या तरी देशाच्या लष्करानंच प्रशिक्षण दिलं होतं, यात शंका नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2016 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close