S M L

आमिरचं राहणार 'अतुल्य भारत'चा ब्रँड अॅम्बेसेडर

Sachin Salve | Updated On: Jan 6, 2016 05:10 PM IST

आमिरचं राहणार 'अतुल्य भारत'चा ब्रँड अॅम्बेसेडर

06 जानेवारी : असहिष्णुता वादावर जाहीर भाष्य करणं अभिनेता आमिर खानला भोवलं की काय अशी शक्यता निर्माण झालीये. कारण, 'अतुल्य भारत' च्या जाहिरातीतून आमिरला वगळ्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, पर्यटन मंत्रालयाने आमिर खानचं ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे असं स्पष्ट केलंय.

भारतात अलीकडे असहिष्णुता वाढलीये. त्यामुळे देशात राहण्यास भीती वाटतेय. पत्नी किरणने आपल्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता असं वक्तव्य आमिर खानने एका पुरस्कार सोहळ्यात केलं होतं. आमिर खानच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भाजपच्या नेत्यांनी आमिरवर एकच टीकास्त्र सोडलं. आमिरनेही आपण जे बोललो त्यात काही चुकीचं नाही आणि माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका मांडली होती. हा वाद शमल्यानंतर आता 'अतुल्य भारत'च्या जाहिरातीत आमिर खान दिसणार नाही. तो 'अतुल्य भारत'चा ब्रँड अॅम्बेसेडर असणार नाही असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून सांगण्यात येत होतं. जाहिरातीचा करार आधीच रद्द करण्याची हालचाल सुरू झाली होती.  पण आता पर्यटन  मंत्रालयानं  आमिर खानचा जाहिरातीचा करार रद्द केला नाही. तो या पुढेही अॅम्बेसेडर असणार आहे असं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2016 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close