S M L

डिसेंबरमध्ये राम मंदिराच्या कामाला सुरुवात, स्वामींचा 'राम-राग'

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2016 05:06 PM IST

डिसेंबरमध्ये राम मंदिराच्या कामाला सुरुवात, स्वामींचा 'राम-राग'

07 जानेवारी : अयोध्यामधील राम मंदिरचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मंदिर निर्माणच्या तारखेची घोषणा केली आहे. या वर्षांच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात राम मंदिरचे काम सुरू होईल असा दावा स्वामी यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडालीये.

आम्हाला डिसेंबरपर्यंत कोर्टाची परवानगी मिळून जाईल आणि डिसेंबरमध्ये कामास सुरुवात होईल असं वक्तव्य स्वामी यांनी केलंय.

तर दुसरीकडे एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय.

सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या प्रकरणावर कोणतीही सुनावणी सुरू नाही. स्वामी यांनी कोणत्या आधारे डिसेंबरमध्ये राम मंदिराच्या कामास सुरुवात होईल असं सांगत आहे. स्वामी हे काय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का ? असा टोला ओवेसींनी लगावला. तसंच कोर्टाच्या निर्णयाआधी अशी विधानं करणं हा कोर्टाचा अवमान आहे. अशी विधानं करून देशात अशांतता पसरवली जात आहे असा आरोपही ओवेसींनी केला.

विशेष म्हणजे मागील महिन्यातच राम मंदिर उभारणीच्या हालचालींना सुरुवात झालीये. अयोध्येत मंदिरासाठी शिला दाखल झाल्या आहे त्यावरुनही वाद निर्माण झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2016 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close