S M L

इसिसने दिली धमकी, ओवेसींचा दावा

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2016 05:50 PM IST

owasisi07 जानेवारी : नुकतीच इसिस या अतिरेकी संघटनेकडून धमकी आल्याचा दावा एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ओवेसींनी इसिस ही एक दहशतवादी संघटना असल्याचंही स्पष्ट केलं. अमेरिका त्यांच्या पाठीशी असल्याने इसिस आज शक्तिशाली असल्याचंही ओवेसींनी म्हटलंय.

एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी हे त्यांच्या तिखट भाषणांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांची विधानं कायम मीडियाच्या

हेडलाईन्स असतात. त्यांच्या वक्तव्यांमधून पंतप्रधान मोदी देखिल बचावले नाहीत. परंतु ओवेसींच्या या धमकीच्या दाव्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेता संगीत सोम यांनी देखील इसिसकडून अशीच धमकी मिळाल्याची पोलिसांत तक्रार केली होती. सोम यांचे नाव मुझफ्फरनगरच्या दंगलीमध्ये गाजलं होतं. या सर्व बाबींना खरं मानलं तर इसिस खूप विचारपूर्वकरित्या निवडक लोकांना टार्गेट करत असल्याचं दिसून येतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2016 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close