S M L

देशभरातील 5 लाख बँक कर्मचारी आज संपावर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 8, 2016 03:13 PM IST

देशभरातील 5 लाख बँक कर्मचारी आज संपावर

08 जानेवारी : 'ऑल इंडिया बँक एम्प्लाॅइज असोसिएशन'ने आज एक दिवसाच्या बँक संपाची हाक दिली आहे. तब्बल पाच लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने सरकारी बँकांचे कामकाज आज दिवसभर ठप्प होण्याची शक्यता आहे.

स्टेट बँकेनं लागू केलेल्या कर्मचार्‍यांचा रोजच्या कामाच्या वेळेत वाढ करणं, आठवड्याचे सातही दिवस 24 तास बँक सुरू ठेवणं, या आणि अशा जाचक धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचं असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. बँक कर्मचार्‍यांसाठी एकतर्फी सेवाशर्ती लादणं अन्यायकारक आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. नुकतीच या संदर्भात दिल्लीत श्रम आयुक्तांकडे बैठक झाली; मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने संप अटळ सांगण्यात येत आहे.

या संपात स्टेट बँकेच्या अखत्यारितील स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, त्रावणकोर, मैसूर, हैद्राबाद आणि पटीयाला या उपशाखाही सहभागी असतील. मात्र या संपाला जोडून महिन्यातील दुसरा शनिवार आणि रविवार येणार असल्याने बँकेचे व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना आता थेट सोमवारपर्यंत वाट पहावी लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close